स्वप्न शिवाराचे…दुष्काळमुक्तीचे

Posted on Leave a commentPosted in Uncategorized

स्वप्न शिवाराचे…दुष्काळमुक्तीचे विजय चोरमारे पाण्याची उपलब्धता नसेल तर गावात राहणे मुश्किल आणि गाव सोडणे त्याहून मुश्किल याची जाणीव लोकांना होऊ लागली. त्यातूनच जलयुक्त शिवाराची लोकचळवळ गतिमान बनली. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या या योजनेचा लेखाजोखा. महाराष्ट्रात गेले काही महिने जलयुक्त शिवार योजनेचा बोलबाला सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत असे म्हटले जाते की, एकतर ते […]

येरळा नदी पुनरुज्जीवन

Posted on Leave a commentPosted in Uncategorized

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात खटाव तालुक्या्च्या उत्तरेस सेवागिरी महाराजाच्या वास्तवाने पवित्र झालेल्या भूमितून येरळा नदी मांजरवाडी येथील डोंगरामध्ये उगम पावते. खटाव तालुक्याजचे सरासरी पर्जन्यमान 300 ते 400 मि.मी. असून सातारा जिल्हयातील सर्वात कमी पावसाच्या कायमस्वरुपीदुष्काळी भागामध्ये समावेश होतो.नदीचे उगमापासून 17 किमी अंतरावर ब्रिटीशकालीन नेर मध्यम प्रकल्प असून सन1937 मध्ये बांधण्यात आला आहे. परंतु सध्या नेर […]

माणगंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

Posted on Leave a commentPosted in Uncategorized

माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील माण–दहिवडी तालुक्याूतील कुळकजाई या गावच्या परिसरातील डोंगररांगातून होतो. माणगंगा एकशे पासष्ट किलोमीटर लांबीच्या पात्रातून वाहते. ती भिमा व कृष्णा या नद्यांची उपनदी आहे. सातारा,सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या या नदीच्या परिसराला माणदेश म्हणून ओळखला जातो. उगमस्थळी डोंगराच्या पोटातून वाहणारे पाणी, उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, उंच झाडांनी नटलेला परिसर, त्या ठिकाणची पुरातन मंदिरे, औषधी वनस्पती असलेला हा परिसर पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता. परंतु आता नदीक्षेत्रात पर्यावरण पूरक उपयुक्त झाडे नाहीत. त्याऐवजी काटेरी झाडांनी नदी परिसर वेढला आहे. कुळकजाई डोंगरामध्ये बहुतांश भाग दगडी व खडकाळ स्वरुपाचा असल्याने या ठिकाणी पाणी मुरण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्या खडकांना ठरावीक भागात मुरमाप्रमाणे स्तर असल्याने नदीकाठच्या विहिरी व विंधन विहिरींची पाण्याची पातळी नेहमी वाढते. पण पुढे दुष्काळी भागात माण नदीला पाणी नसल्याने पात्रात असंख्य काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात उगवतात. अशी ही नदी सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातून वाहते. तालुक्याुचा पिण्याचा पाण्याचा, शेतीचा व चाऱ्याचा प्रश्नल सोडविण्यासाठीचा जलसंधारणाचा उपाय म्हणून तालुक्याुतून वाहणाऱ्या माणगंगा या मुख्य नदीचे पुनरुज्जीवन करणे होय. माणगंगा नदीचे पुनरुज्जीवन झाल्यास या नदीच्या खोऱ्यातील सर्व भागामधील भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास निश्चिपतच मदत होईल व दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरुपी मात करणे शक्यर होईल. ही बाब लक्षात घेऊन श्री. प्रभाकर देशमुख यांनी नदीला गतवैभव प्राप्त करून देण्याचा चंग बांधला. एवढेच नव्हे तर त्यासाठी घसघशीत निधीची तरतूद केली. कायमस्वरूपी दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्याहतील सरासरी पर्जन्यमाम 250 मि.मी. इतके आहे. येथील पाऊस अनियमित आणि कमी प्रमाणात असल्याने तालुक्याोला बहुतेक वेळा दुष्काळामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची तीव्र समस्या जाणवते. पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्नर निर्माण होतो व काही वेळा चारा छावण्याही सुरु करावा लागतात. अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी माणगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव हाती घेण्यात आला आहे. ‘सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र, जलयुक्त शिवार अभियान‘या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनाअंतर्गत विविध संस्था, प्रशासन व लोकसहभागातून विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.रानमाळा, दहिवडी, भांडवली, पांगरी, इंजबाव, शेरेवाडी, मार्डी या गावांमध्ये लोकसहभागातून मोठी कामे सुरू आहेत. पूर्ण, प्रगतीपथावरील व प्रस्तावीत कामांमुळे 13 हजार 613 टी.एम.सी. इतका पाणीसाठी होणार असून त्याचा लाभ जवळपास 70 गावामधील 90 हजार लोकसंख्येला होणार आहे. त्यामुळे 3 हजार 318 हेक्टतर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शासनाचे लघुसिंचन विभागामार्फत 11 गावांमध्ये 12 सिमेंट नाला बांधकामे पूर्ण करण्यात आली असून त्याद्वारे 341 टी.सी.एम.पाणीसाठी निर्माण झालेला असून 71 हेक्टणर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच सदर विभागामार्फत 4 कामे सुरू असून त्याद्वारे 114 टी.सी.एम. इतका पाणीसाठी होणार असून 22 हेक्टरर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत 67 गावांमध्ये सिमेंट व माती नाला बांधाची एकूण 821 कामे पूर्ण झाली आहेत. त्याद्वारे 5225 टी.सी.एम.पाणीसाठी निर्माण झालेला आहे. तसेच प्रस्तावीत 1 हजार 526 कामांतर्गत 8320 टी.सी.एम. इतका पाणीसाठी निर्माण होणार आहे. कृषी विभागाकडील पूर्ण व प्रस्तावीत कामांमुळे 2660 हेक्टटर इतके क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. तालुक्याेची पूर्ववाहिनी असणाऱ्या माणगंगा नदीवर असलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (के.टी.विअर) नादुरुस्त झाले असून मोठ्या प्रमाणात वाळू व मातीचे थर साचले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यामध्ये पूर्णक्षमतेने पाणीसाठी […]