येरळा नदी पुनरुज्जीवन

Posted on Posted in Uncategorized

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात खटाव तालुक्या्च्या उत्तरेस सेवागिरी महाराजाच्या वास्तवाने पवित्र झालेल्या भूमितून येरळा नदी मांजरवाडी

येथील डोंगरामध्ये उगम पावते. खटाव तालुक्याजचे सरासरी पर्जन्यमान 300 ते 400 मि.मी. असून सातारा जिल्हयातील सर्वात कमी पावसाच्या कायमस्वरुपीदुष्काळी भागामध्ये समावेश होतो.नदीचे उगमापासून 17 किमी अंतरावर ब्रिटीशकालीन नेर मध्यम प्रकल्प असून सन1937 मध्ये बांधण्यात आला आहे. परंतु सध्या नेर मध्यम प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रकल्पाच्या जिवंत पाणी साठ्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. नेर मध्यम प्रकल्पापासून येरळा नदी पात्राची रुंदी 60 मीटर ते 80 मीटर असून नदी पात्र गाळाने भरले आहे त्यामुळे पावसानंतर डिसेंबरपासून नदीपात्र कोरडे पडलेले असते. नदीपात्रामध्ये मोठया प्रमाणात गाळ साचल्याने नदी प्रवाहात पाणी टिकून राहत नाही. त्यामुळे येरळा नदी पात्राच्या दोन्ही तीरावरील पाणी पातळी खोल गेलेली आहे. येरळा नदी काठावरील नेर, पुरेगाव, काटकरवाडी, खातगुण, खटाव, भुरकवाडी, वाकेश्वतर, वडूज, गणेशवाडी, अंबवडे,गोरेगांव, कमदवाडी, निमसोड, शितोळेवाडी, चितळी या गावामध्ये नेहमी पाणी टंचाई भासत असते. नेर मध्यम प्रकल्पापासून 36.50 किमी अंतरावर खटाव तालुक्याडमध्ये सन 1972 च्या दुष्काळामध्ये येरळवाडी मध्यम प्रकल्पाचे बांधकाम झालेले आहे. नेर धरणाच्या खालील बाजूस 5 व येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या खालील बाजूस 4 असे एकूण 9 सिमेंट कॉंक्रीट बंधारे प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.येरळा नदीचा उगम मांजरवाडी येथील डोंगरात होत असून नेर मध्यम प्रकल्पापर्यंत नदीची लांबी सुमारे 17 किं.मी. एवढी आहे. या अंतरामध्ये नदीच्या तीरावर मांजरवाडी, मोळ, डिस्कळ, शिंदेवाडी, ललगुण, नागनाथवाडी, काटेवाडी इत्यादी गावे येतात. त्यानुसार मांजरवाडी, मोळ, डिस्कळ, शिंदेवाडी, ललगुण येथे 11 सिमेंट कॉंक्रिट बंधारे प्रस्तावित करण्यात येत आहेत. सदर कामांची अंदाजपत्रकीय रक्कम रु.390 लक्ष एवढी आहे. माणंगगा नदीप्रमाणे येरळा नदीसाठीही जलसंधारण विभागाचे सचिव श्री. प्रभाकरजी देशमुख यानी अथक परिश्रम घेऊन ही योजना मार्गी लावली.

माणगंगा व येरळा या नद्यांवर सिमेंट नाला बांध बांधण्याचा कार्यक्रमास

शासनाने डिसेंबर 2015 मान्यता दिली आहे.

येरळा नदीवरील मंजूर सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्याच्या कामांना शासनाने

अपेक्षित खर्च 5 कोटी एवढा मंजूर केला आहे. त्यानुसार 2015-16 या

वर्षामध्ये रु. 2 कोटी 50 लाख निधी सरकारने डिसेंबर 2015 ने उपलब्ध करून

दिलेला आहे.

सदर मंजूर प्रस्तावित कामांची निविदा कार्यवाही सुरु आहे. येरळा नदीवरील

मंजूर 9 सिमेंट कॉंक्रीट बंधारे मार्च 2016 अखेर पूर्ण करण्याचे नियोजित

आहे. प्रशासकीय मान्यता योजनांचा तपशील खालील प्रमाणे

येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम अंतर्गत मंजूर कामे (नेर धरणाच्या खालील बाजूस)

सिमेंट कॉंक्रीट       तालुका        लांबी     अंदाज–पत्रकीय  पाणीसाठी

सिंचन

बंधारा                                         मी.          किंमत

रु.लक्ष स.घ.मी.           क्षमता हे

नेर क्र.2               खटाव            32           32.31

31.54                  10

पुसेगाव क्र.1         खटाव            18           17.54             16.05

5

भांडेवाडी क्र.1      खटाव             20          22.66

27.41               8

खटाव क्र.3          खटाव              35          21.1              20.26

7

खटाव क्र.4           खटाव            35           29.92           25.51

8

अंबवडे क्र.2         खटाव             75           70.96          52.88

16

गोरेगाव क्र.2       खटाव             60             56.43         49.45

15

मरकवाड क्र.2    खटाव             70            40.63         41.36

12

निमसोड क्र.2      खटाव           75              51.89          51.31

15

येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम अंतर्गत उगम (मांजरवाडी) ते नेर धरण या

17 कि,मी. अंतरामध्ये खालीलप्रमाणे नव्याने 11 सिमेंट कॉंक्रीट बंधारे

प्रस्तावीत करण्यात येत असून रु. 3कोटी 90 लाख एवढ्या निधीची आवश्य कता

आहे.

सिमेंट कॉंक्रीट तालुका लांबी अंदाज–पत्रकीय

पाणीसाठा सिंचन

बंधारा मी. किंमत रु.लक्ष

स.घ.मी. क्षमता हे.

मांजरवाडी क्र.1 खटाव 15 16.00

25.00 5

माजरवाडी क्र.2 खटाव 15 16.00 25.00

5

मोळ क्र.1 खटाव 20 22.00

35.00 8

मोळ क्र.2 खटाव 20 22.00

35.00 8

डिस्कळ क्र. 1 खटाव 35 42.00

60.00 12

डिस्कळ क्र.2 खटाव 35 42.00

60.00 12

शिंदेवाडी खटाव 36 45.00

60.00 12

ललगुण क्र.1 खटाव 36 45.00 60.00

12

ललगुण क्र.2 खटाव 36 45.00 60.00

12

ललगुण क्र.3 खटाव 36 45.00 60.00

12

ललगुण क्र.4 खटाव 36 50.00 60.00

12

येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम अंतर्गत प्रशासकीय मान्यता असलेल्या नेर

धरणाच्या खालील बाजूकडील 9 सिमेंट कॉक्रीट बंधारे कामांची निविदा

कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सदरील कामे मार्च 2016 अखेर पूर्ण करण्याचे

नियोजन आहे. शासनाने वितरीत केलेला 2 कोटी 50 लाख निधी खर्च कऱ्ण्याचे

प्रस्तावित आहे.

येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम अंतर्गत नव्याने प्रस्तावित असलेल्या

नेर धरणाच्या वरील बाजू कडील कामांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

या कामांना शासनाने 3 कोटी 90 लाख एवढा निधी उपलब्ध करून दिल्यास सदरील

कामे जून 2016 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *